top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

सर्व अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी संकटाच्या काळात केलेले काम हे सलाम करावे असेच आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, करवीर डीवायएसपी डॉ.प्रशांत अमृतकर, शहर डीवायएसपी प्रेरणा कट्टे व कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातही पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला.

कोरोनाच्या काळात जसे सर्व डॉक्टर लोकांना सेवा देण्यासाठी काम करत होते, तसे पोलीससुद्धा या काळात रात्रंदिवस कार्यरत होते. सर्व अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी संकटाच्या काळात केलेले काम हे सलाम करावे असेच आहे.

कोरोनाच्या काळात घरी राहा आणि सुरक्षित राहा असा संदेश सर्वत्र दिला जात होता .पण सर्व पोलीस मात्र घराबाहेर पडून कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी ,रस्त्यावर कोणी फिरू नये, नाक्यावरून विना पास कोणी प्रवेश करू नये, या सारखी जिवावर बेतणारी कामे करत होते. अगदी घरी गेल्यावर आपल्या कुटुंबियांना, मुलांना भेटणे सुद्धा आपल्याला कठीण झाले होते. पण हे असले तरी आपण आपले कर्तव्य महत्वाचे मानून लोकांच्या सुरक्षिततेसाठी काम केले, याबद्दल पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

यावेळी प्रामुख्याने खालील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

१) आगामी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणे २) सानेगुरुजी, सुभाषनगर व आर. के. नगर येथील पोलीस ठाण्यांना मान्यता मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे. ३) कोरोना प्रबोधनासाठी पोलीस खात्याबरोबर इतर विभागांचा समावेश करणे. ४) बंदोबस्तासाठी कायमस्वरूपी होमगार्ड मिळणे. ५) पोलीस विभागाला आरोग्य विभागप्रमाणे इतर कामासाठी निधी मिळणे. ६) शहरातील ट्रॅफिक सुरळीत करणे ७) राजारामपुरी भागात रस्ता सुरक्षा मार्गदर्शक फलक लावणे ८)परप्रांतीय मजूर परत आल्यावर त्यांची नोंदणी करून घेणे.

या मीटिंग वेळी पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे, सुनील पाटील, वसंत बाबर, सुशांत चव्हाण, दीपक भांडवलकर , सरोजिनी चव्हाण हे अधिकारी सहभागी झाले होते.

- आ. ऋतुराज पाटील



8 views0 comments

Comments


bottom of page