श्री. भूपाल शेटे यांच्या प्र.क्र.६० जवाहरनगर प्रभागातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा काँग्रेस पक्षाचे युवा नेते व प्रसिद्ध कवी श्री. मोहम्मद इम्रान प्रतापगडी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी, सिरत मोहल्ला मदरसा भवन, एम.एम. ग्रुप व्यायाम शाळा हॉल, दत्त तालीम मंडळ हॉल तसेच ११ लाख लिटर अंडर ग्राउंड पाण्याची टाकी व सौर पंप हाऊस आदी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
सुप्रसिद्ध कवी श्री. मोहम्मद इम्रान प्रतापगडी यांनी त्याच्या खास शैलीमध्ये कोल्हापूरकरांशी मनमोहळा संवाद साधला. त्यांनी त्यांच्या शायरी व कविता ऐकवून प्रभागातील नागरिकांची मने जिंकली.
यावेळी, गृहराज्य मंत्री तथा पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील, आ. चंद्रकांत जाधव, श्री. अभय छाजेड, सौ. निलोफर आजरेकर, भूपाल शेटे, तौफिक मुल्लाणी, सिद्दीक कच्छी, जाफर मोमीन, अब्दुल शेख चाचा, निरंजन कदम, सर्जेराव साळोखे, माणिक मंडलिक, शादाब अत्तार, इस्माईल बागवान, राहुल माने, जाफर बाबा सय्यद, मौलाना मोमीन, गाणी आजरेकर, तुळशीदास व्हटकर तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
- आ. ऋतुराज संजय पाटील
Comments