राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री, ना. सुनील केदार साहेब यांना भेटून महाराष्ट्र शासनाकडून वृध्द खेळाडूंना प्रतिमहिना मिळणारी मानधन रक्कम वाढवून व प्रलंबित आठ महिन्यांचे मानधन तात्काळ देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
महाराष्ट्र शासनाकडून हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी पैलवानांना प्रतिमहिना सहा हजार, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना चार हजार, तर राष्ट्रीय खेळाडूंना अडीच हजार रुपये मानधन दिले जाते. सद्याची परिस्थिती पाहता ही मानधनाची रक्कम वाढवून मिळावी अशी या वृध्द खेळाडूंची मागणी आहे. या संदर्भात त्यांनी सुध्दा वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केल्याचे समजते. तसेच या खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनापैकी मार्च 2020 ते जुन 2020 पर्यंतचे मानधन मिळाले असून उर्वरीत आठ महिन्याचे मानधन अद्यापही त्यांना मिळालेले नाही. याच पार्श्वभूमीवर आज ना. केदार साहेबांची भेट घेऊन हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची विनंती केली.
- आ. ऋतुराज पाटील
Comments