महाराष्ट्रातील माजी सैनिक व शहीद जवानांच्या विधवा पत्नी व अवलंबित पाल्यांसंदर्भात मंत्रालयात गृहराज्यमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सचिव व अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील माजी सैनिक व शहीद जवानांच्या विधवा पत्नी व पाल्यांसंदर्भातील विविध विषय या बैठकीमध्ये मांडले. या मुद्द्यांसोबतच मा. गृहराज्यमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांनी खालील मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. - देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या विधवा पत्नी व पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये थेट नियुक्ती देणे तसेच शहीद जवान व माजी सैनिकांना नियमाप्रमाणे जमिनीचे वाटपाच्या कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ३ महिन्यांमध्ये सादर करण्याच्या सूचना आज देण्यात आल्या आहेत. - म्हाडाच्या गृहसंकुल योजनेमध्ये माजी सैनिक यांना ५% आणि शहिदांच्या कुटुंबियांना २% आरक्षण असून २०.१०.२० च्या शासन निर्णयाद्वारे माजी सैनिकांच्या पाल्यांना पदवी, पदवीका व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता ५% आरक्षण देण्यात आले आहे. तसेच या संदर्भातील सविस्तर माहिती राज्यातील सर्व माजी सैनिक व शहीद जवानांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचविणे. - माजी सैनिक, शहीद जवानांच्या विधवा पत्नी व अवलंबित पाल्यांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी माजी सैनिक कल्याण विभागाचे संकेतस्थळ तयार करणे. - राज्यातील माजी सैनिक व शहीद जवान कुटुंबीयांचा घरफाळा माफ करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने नुकताच घेतला असून त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांनी या निर्णयासंदर्भात त्वरित कार्यवाही करणे. - सैनिक सेवेत असताना कुटुंबापासून दूर राहतो यासाठी माजी सैनिकांना पुनर्नियुक्तीनंतर सोयीनुसार कामाचे ठिकाण देण्याबाबतचीही कार्यवाही लवकरात लवकर करण्यासंदर्भात यावेळी सूचना करण्यात आल्या आहेत. - आ. ऋतुराज पाटील
Comments