करवीर, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील परदेशी शिकण्यासाठी जाणाऱ्या २१ विद्यार्थ्यांचे लसीकरण वडणगे येथील केंद्रावर मंगळवारी करण्यात आले. मी केलेल्या विनंतीनुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी जि.प. च्या माध्यमातून ग्रामीण भागातील,विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीमेचे नियोजन केले आहे.
परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ५७ विद्यार्थ्यांनी लसिकरणासाठीची नोंदणी केली आहे. जिल्हा परिषदेने या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी तीन तालुक्यासाठी एका मध्यवर्ती ठिकाणी विशेष लसीकरण मोहीम घेण्याचे नियोजन केले आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांना याबाबत लवकर कार्यवाही करण्याचे विनंती केली होती.
त्यानुसार ही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी नोंदणी केलेल्या करवीर पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील २१ विद्यार्थ्यांचे लसीकरण वडणगे येथील केंद्रावर मंगळवारी करण्यात आले. वडणगे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉ.खलीपे आणि स्टाफने यासाठी सहकार्य केले. २८ दिवसानंतर या विद्यार्थ्यांना दुसरा डोस मिळणार आहे.
Comments