top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या 'माझं कोल्हापूर, माझा रोजगार' अंतर्गत............

पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या 'माझं कोल्हापूर, माझा रोजगार' अंतर्गत कोल्हापुरातील स्थानिक युवक-युवतींना आम्ही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. या माध्यमातून अनेक उद्योजकांशी संवाद साधताना एक गोष्ट प्रामुख्याने निदर्शनास आली, ती म्हणजे स्किलड मॅनपॉवरची उद्योगाला असणारी गरज..

कोल्हापुरातील युवक-युवतींचे स्किल वाढावे यासाठी त्यांना हँडस ऑन प्रशिक्षण देण्यासाठी शिरोली एमआयडीसी परिसरात शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसीएशनने सुरू केलेले आयटीआय ( औद्योगिक प्रशिक्षण केंद्र) अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. या आयटीआयला भेट दिली. रोजगारभिमुख सध्या उपलब्ध असलेल्या आणि नव्याने सुरु कराव्या लागणाऱ्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांविषयी सविस्तर चर्चा केली.प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होण्यासाठी या आयटीआयचे योगदान कौतुकास्पद आहे.



5 views0 comments

Comments


bottom of page