कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पाचगाव येथील पाणी प्रश्नांबाबत आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कोल्हापूर महानगरपालिका अधिकारी आणि पाचगाव लोकप्रतिनिधी यांच्यासोबत सविस्तर बैठक घेतली.
यावेळी, पाचगावातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याच्या सूचना जलअभियंता नारायण भोसले यांना दिल्या असून या संदर्भातील कार्यवाही लवकरच केली जाईल. तसेच, पाचगावची वाढतील लोकसंख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा वाढविण्यासंदर्भात प्राधिकरणाचे डी.के. महाजन आणि ए.डी. चौगुले यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून सूचना करण्यात आल्या आहेत.
यावेळी, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, प्रवीण कुंभार, नारायण गाडगीळ, संग्राम पोवाळकर, प्रकाश गाडगीळ, धनाजी सुर्वे, विष्णू डवरी आदी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
コメント