कोल्हापुरातील कसबा बावडा येथील डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आज ३८ व्या वर्षात पदार्पण करत आहे. केवळ ४ अभ्यासक्रम व २४८ विद्यार्थ्यांसह सुरु झालेल्या या महाविद्यालयातून साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
एखाद्या कॉलेजने 37 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण करणे, हा त्या कॉलेजसाठी एक अभिमानाचा क्षण असतो. आदरणीय डी. वाय पाटील दादांनी १९८४ मध्ये डी.वाय.पाटील शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि कसबा बावडा मध्ये आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्यारूपाने इंजिनिअरिंगचे दर्जेदार शिक्षण देणारे कॉलेज यानिमित्ताने सुरू झाले.
खरे पाहायला गेले तर त्या काळामध्ये असे कॉलेज सुरू करणे हे फार मोठे धाडस होते. पण माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील साहेबांनी विनाअनुदानित तत्त्वावर इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याचा जो निर्णय घेतला त्यानुसार आदरणीय दादांनी हे कॉलेज सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
या कॉलेजच्या रूपाने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि मध्यमवर्गीय मुलांनी इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहिले आणि आजपर्यंत हजारो विद्यार्थी या कॉलेजमधून इंजिनिअर होऊन बाहेर पडले. हे देशाबरोबरच परदेशातील अनेक नामवंत कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर सध्या काम करत आहेत, हीसुद्धा आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
१९९० मध्ये दादांनी महाविद्यालयाचे नेतृत्व डॉ. संजय पाटील यांच्याकडे सोपविले. संजय साहेबांनी दादासाहेबांनी रचलेल्या भक्कम पायावर शिक्षणरूपी मंदिराला कळस चढविण्याचे काम केले. त्यामुळे या इंजिनीरिंग कॉलेज बद्दल त्याच्या मनामध्ये एक भावनिक नाते आहे.
माझ्यावर जेव्हा ट्रस्टी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली तेव्हा आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन निरनिराळे प्रयोग करून इन्फ्रास्ट्रक्चर, अभ्यासक्रम, प्लेसमेंट अद्दींमध्ये बदल केले. यामुळे, नॅकचे A प्लस नामांकन, विद्यापीठाचे कायमस्वरूपी अफिलेशन, आणि अटोनॉमी कॉलेजला मिळाली.
हे सर्व करत असताना कॉलेजमधील सर्व स्टाफचे यामधील योगदान खूप महत्त्वाचे आहे. कारण कॉलेजमधील बरेच स्टाफ अगदी सुरुवातीपासून आज आखेर कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. या सर्वांचा या कॉलेजच्या प्रगतीमध्ये महत्वाचा वाटा आहे.
यापुढील काळामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण चांगल्या प्रकारे काम करून या कॉलेजचा पर्यायाने संस्थेचा नावलौकिक कसा होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरीची संधी मिळवून देण्याचे आमचे ध्येय आहे.
Comments