कोल्हापुरातील शेंडा पार्क परिसरातील 25 हजार झाडे असणाऱ्या वनराईला काही दिवसांपूर्वी आग लागली होती. यातील 3 हजार झाडांचे पूर्ण नुकसान झाले होते. 22 हजार झाडांना पाणी दिल्यास ही झाडे पुन्हा जगू शकतात, अशी परिस्थिती होती. या ठिकाणी जाऊन या झाडांची पाहणी केली. आपल्या सर्वांना जीवन देणारी ही झाडे काहीही करून जगली पाहिजेत, असा निर्धार केला. डॉ.डी.वाय.पाटील ग्रुप तर्फे पाणी टँकर द्यायची व्यवस्था केली. पाचगाव, मोरेवाडी ग्रामपंचायत यांनी सहकार्य केले. वृक्षाप्रेमी सारख्या सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्या. गेल्या काही दिवसात पाऊसही सुरू झाला. आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे आगीत नुकसान झालेल्या या झाडांना नवी पालवी पालवी फुटली. नवसंजीवनी मिळालेली ही झाडे भविष्यात आपल्या सर्वांना भरभरून ऑक्सिजन देतील. ही झाडे जगली याचा मोठा आनंद या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आहे.
आपण सर्वांनी मिळून निसर्ग जपुया.. वनराई वाचवूया.
- आ.ऋतुराज पाटील
Comments