कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कणेरीवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळेचे उदघाटन शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते आणि पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले.
ही डिजिटल शाळा 29 लाखांच्या लोकवर्गणीतून सुसज्ज करण्यात आली आहे. 1930 साली सुरू झालेली ही शाळा आज जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी आदर्शवत अशा पद्धतीने नव्याने तयार करण्यात आली आहे. सर्व २४ खोल्यांमध्ये ई-लर्निंगची सुविधा व साउंड सिस्टिम, डिजिटल बोर्ड, रंगरंगोटी, वारली पेंटिंग्स, बोलक्या भिंती, ऑक्सिजन पार्क, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक लॅब, स्वच्छता गृहे, मैदान, सीसीटीव्ही कॅमेरे आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग सुविधांनी सज्ज करण्यात आली आहे.
आपण नेहमी पाहतो की लोक साधारणपणे सण, उत्सव या निमित्ताने एकत्र येतात, आपापल्या पद्धतीने आर्थिक मदत करतात आणि उत्साहाने उत्सव साजरा करतात. पण कणेरिवाडीच्या जनतेने एकत्र येऊन लोकवर्गणीतून डिजिटल शाळेला पाठबळ देऊन राज्यात एक आदर्श निर्माण केला आहे. याबद्दल या सर्वांचे मी आमदार म्हणून मनापासून आभार मानतो.
आज कणेरीवाडी शाळेत 713 इतके विद्यार्थी आहेत. आणि हे सर्व घडण्यामागे येतील ग्रामस्थ आणि शिक्षक यांचे प्रयत्न कारणीभूत आहेत. कणेरीवाडी शाळेचे हे मॉडेल संपूर्ण राज्यात आदर्श ठरेल, असा मला विश्वास वाटतो. भविष्यात या शाळेला लागेल ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही देतो.
यावेळी, खासदार संजय मंडलिक, आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगावकर, जि.प. अध्यक्ष बजरंग पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जि.प. माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, उपाध्यक्ष सतीश पाटील, समाज कल्याण सभापती जि.प. स्वाती सासणे, शिक्षण सभापती प्रवीण यादव, महिला बालकल्याण सभापती सौ. पद्मरानी पाटील, करवीर सभापती सौ. अश्विनी धोत्रे, उपसभापती सुनील पवार, पं.स.सदस्य श्रीमती मंगल पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य सरीता शशिकांत खोत, सरपंच श्रीमती शोभा खोत, कुमार मोरे, उपसरपंच अजित मोरे, मोहन कदम, रवींद्र खोत, राहुल ढाकणे, श्रीमती मनीषा महाद्वार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments