कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्या वतीने आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये आ.चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी तसेच नगरसेवक यांच्यासोबत सहभागी झालो.सद्या बाहेरील शहरातून लोक कोल्हापूरात येत आहेत. यावेळी नगरसेवकांनी प्रभाग समिती सचिव तसेच सर्व समिती सदस्य यांच्या मदतीने लोकांचे प्रबोधन करावे,लोकांच्या संपर्कात राहून त्यांना आश्वस्त करावे,अशा सूचना केल्या. मा.आयुक्त, नगरसेवक, प्रभाग समिती सचिव आणि महापालिका कर्मचारी यांनी चांगले काम केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
- आ.ऋतुराज पाटील
Comments