कोल्हापूर नगरी ही छत्रपती शाहू महाराजांची कलाक्रीडा नागरी आहे. या नगरीमध्ये आजवर अनेक नामवंत खेळाडू घडले आहेत. दिव्यांग खेळाडूनीही विविध खेळांमद्धे आपली छाप सोडली आहे. पँरालिंम्पिक स्पोर्टस असोसिएशन कोल्हापूर यांनी जागतिक अपंग दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ७ मार्च २०२० रोजी झालेल्या जिल्हास्तरिय स्पर्धेत प्राविण्य मिळवणाऱ्या सर्व स्पर्धकांना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने, उपाध्यक्ष विकास चौगुले, सचिव विनायक सुतार, उमेश चटके, युनूस शेख, इतर पदाधिकारी व दिव्यांग खेळाडू उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comentários