कोल्हापुरातील युवक-युवतींना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेल्या 'मिशन रोजगार' या उपक्रमाच्या अंतर्गत आज 'एच आर फोरम इंडिया' संस्थेच्या प्रतिनिधींशी कोरोना नंतर काळातील रोजगाराच्या संधी, लागणारे कौशल्य व त्यासाठी लागणारी प्रशिक्षण व्यवस्था या बाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी, एचआर फोरम इंडियाचे महेश कुईगडे, संतोष क्षीरसागर, संजय बेनके, सोमनाथ महानवर, अनंत पाटील-कोरे यांच्याशी कोल्हापुरातील सध्य मनुष्यभरती परिस्थिती व कोरोना काळातील आव्हाने, नवीन रोजगार निर्मिती, कुशल मनुष्यबळ, त्यासाठी सक्षम कौशल विकास कार्यक्रम/प्रशिक्षण, तसेच उद्योगांसाठी लागणारी पायाभूत सुविधा या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. कोल्हापुरातील होतकरू युवक-युवतींना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- आ. ऋतुराज पाटील
Comments