काल कसबा बावडा येथील श्रीकांत उलपे, प्रकाश जाखलेकर, अनिल उलपे, युवराज उलपे यांच्यासह अनेक शेतकरी बांधवांच्या उसाला अचानक आग लागण्याने उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज या क्षेत्राची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती धनाजी गोडसे, नगरसेवक मोहन सालपे, सुभाष बुचडे, तलाठी आर.डी कोरे, गजानन बेडेकर यांच्यासह शेतकरी, सेवा संस्थेचे संचालक उपस्थित होते.
आ. ऋतुराज पाटील
Kommentare