उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या कोल्हापुर जिल्ह्यातील १५१ विद्यार्थांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोविशिल्ड ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार २८ दिवसानंतर कोविशिल्डचा दुसरा डोस मिळणार आहे.
याबाबत योग्य कार्यवाही करण्याची विनंती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना केली असून याची अंमलबजावणी करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
कोल्हापूर शहरातील ९४ विद्यार्थ्यांनी तर जिल्ह्याच्या अन्य भागातील ५७ अशा एकूण १५१ विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.
महापालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या सूचनेनुसार सावित्रीबाई फुले रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर सोमवारपासून कोल्हापूर शहरातील नोंदणी केलेल्या ९४ विद्यार्थांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
जिल्ह्याच्या उर्वरित भागातील ५७ विद्यार्थ्यांच्या लसिकरणासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकी तीन तालुक्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी लवकरच लसीकरण केंद्रावर ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
- आ. ऋतुराज पाटील
Comments