डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन भारताचे माजी कृषिमंत्री सन्माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते व सन्मानीय डॉ.डी.वाय.पाटील दादासाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाची भूमिका बजावणारे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या कृषी दिनी, या कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे उदघाटन होणे हे डी. वाय. पाटील कुटुंबियांसाठी आनंदाचा क्षण आहे.
1989 साली आदरणीय डॉ. संजय डी. पाटील साहेब यांनी पाहिलेले स्वप्न हे त्यांची जिद्द, चिकाटी या बरोबर आई सौ. वैजयंती पाटील यांचे खंबीर पाठबळ व काका ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांची मोलाची साथ यामुळेच साकारले आहे. तळसंदे येथील खडकाळ माळरान ते 'गोल्डन लँड' हा खडतर प्रवास आज या विद्यापीठाची सुरुवात इथवर आला आहे.
या विद्यापीठाच्या माध्यमातून मोठी परंपरा असलेल्या आपल्या कृषी संस्कृतीला आधुनिकतेची जोड देण्याचा आमचा प्रयत्न राहील. देशभरातूनच नव्हे, तर परदेशातूनही विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी या ठिकाणी यावेत, अशाप्रकारे सुविधा देण्यासाठी आमची संपूर्ण टीम कार्यरत राहील. वैज्ञानिक व तंत्रज्ञानपूरक शेतीचा विकास व संशोधनावर आमचा अधिक भर असेल.
येणाऱ्या काळामध्ये या डी. वाय. पाटील ॲग्रीकल्चर ॲन्ड टेक्नीकल या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जागतीक पातळीवर आपला ठसा उमटविणारे विद्यार्थी नक्कीच घडतील, हा विश्वास आहे.
आज या ऑनलाईन उदघाटन सोहळ्याला महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री मा. ना. जयंत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. उदय सामंत, ग्रामविकास मंत्री मा. ना. हसन मुश्रीफ, कृषी राज्यमंत्री मा. ना. डॉ. विश्वजीत कदम, उच्च व शिक्षण राज्यमंत्री मा. ना. प्राजक्त तनपुरे, आरोग्य राज्यमंत्री मंत्री मा. ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर, ऑनलाईन पद्धतीने मा. खा. संभाजीराजे छत्रपती, आ. राजू आवळे, आ. प्रकाश आबिटकर, आ. जयंत आसगावकर तसेच कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Commentaires