आज कोल्हापुरातील साहस डिसेबिलिटी रिसर्च अँड केयर फाउंडेशनचा उदघाटन सोहळा मा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते व ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब, खा. श्रीनिवास पाटीलजी, श्री. तेज घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
दिव्यांग बंधू-भगिनींसाठी साहस फाउंडेशनच्या माध्यमातून नवे व्यासपीठ तयार झाले आहे. दिव्यांगांना स्वावलंबी आणि सन्मानाने जगात यावे यासाठी त्यांना सामान संधी मिळणे आवश्यक आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आपल्या संस्थेची स्थापना झाली आहे. डॉ. नसीमा हुरजूक यांनी ३६ वर्षे दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी केलेले काम हे वाखाण्याजोगे आहे.
ग्रामीण भागामध्ये असलेले कित्येक दिव्यांग बंधू हे पुनर्वसन प्रक्रियेपासून दूर आहेत. ज्यांचे वैद्यकीय, शैक्षणिक पुनर्वसन झाले आहे, अश्या दिव्यांगांना शहरात रोजगार मिळाला असला तरी त्यांना आवश्यक अशी निवासाची सोय उपलब्ध झालेली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, दिव्यांगांना रोजगार देणे, वसतिगृह निर्माण करून देणे, ही गरज आहे आणि हेच काम साहस फाउंडेशनच्या माध्यमातून होणार आहे. जे दिव्यांग शाररिक अडचणींमुळे ये-जा करू शकत नाहीत त्यांना रोजगार देण्यासाठी साहसने मेणबत्ती उत्पादन व विक्रीचा प्रकल्प सुरु केले आहे. हे नक्कीच अभिनंदनीय बाब आहे.
साहस फाउंडेशन मध्ये जुन्या आणि नव्या व्यक्तींच्या समावेशामुळे हे फाउंडेशन भविष्यकाळात दिव्यांगांचे प्रश्न ताकदीने सोडविण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास मला वाटतो, यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याची जबाबदारी आमदार म्हणून मी नक्की पार पाडेन, साहस फाउंडेशनच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
- आ. ऋतुराज पाटील
Comentarios