top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

रिक्षाचालक जितेंद्र शिंदे यांना आमदार ऋतुराज पाटील यांचा मदतीचा हात.

कोल्हापूर मधील टाकाळा परिसरातील श्री. जितेंद्र शिंदे हे रिक्षा चालक म्हणजे कोल्हापूरच्या दातृत्वाचा चालताबोलता इतिहास आहे. श्री जितेंद्र शिंदे हे कोरोनाच्या काळात सुद्धा कोरोना बाधित रुग्णांना मोफत सेवा देत आहेत. त्याचबरोबर गरोदर महिला आणि दिव्यांगांना घरपोच औषधे आणि भाजीपाला सुद्धा त्यांच्याकडून दिला जातो. हे सुद्धा काम ते मोफत करतात. अनेक वर्षांपासून रात्री अपरात्री कोणालाही दवाखान्यात जाण्याची वेळ आली तर मोफत घेऊन जाणे व परत आणून घरी सोडणे हे सुद्धा काम करत आले आहेत. स्वतःची पदरमोड करून समाजाची सेवा करणाऱ्या श्री जितेंद्र शिंदे यासारख्या अवलियाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.


शिंदे यांच्या कामाला हातभार म्हणून आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांना पीपीई किट उपलब्ध करून दिले. स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते दुर्गेश लींग्रस, विनायक सूर्यवंशी, युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष विनायक पाटील, राजदीप भोसले,योगेश हातलगे,शैलेश जाधव सुभाष लगारे,मदन बागल,अनिकेत कांबळे यांच्या उपस्थितीत ही किट शिंदे यांना देण्यात आली.


काही दिवसात आमदार ऋतुराज पाटील यांच्या वतीने श्री.शिंदे यांना भरीव मदत करण्याचे नियोजन केले आहे.



6 views0 comments

Comments


bottom of page