डी. वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूरचा ९ वा दीक्षांत सोहळा आज संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोलेजी तर अध्यक्षपदी कुलपती डॉ. संजय डी. पाटीलजी उपस्थित होते. यावेळी, अभिनेते आर. माधवन, साहित्यिक प्रा. कुंतीनाथ करके, यांना डी.लिट व एअर मार्शल अजित शंकरराव भोसले यांना डी. एस्सी. पदवीने सन्मानित करण्यात आले.
या दीक्षांत समारंभात एकूण ३६१ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली असून यावेळी ९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने तर २ विद्यार्थ्यांना एक्सलन्स ऑफ रिसर्च म्हणून सन्मानित करण्यात आले.
सर्व पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना यशस्वी भवितव्यसाठी आम्हा सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा आणि या सोहळ्यास उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार!
- आ. ऋतुराज पाटील
Comments