कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ (सर्किट बेंच) स्थापन करणेबाबत, आज कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आमदारांनी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची संयुक्त भेट घेतली. यावेळी, मुंबई येथे लवकरच बैठक घेऊन यासंदर्भातला निर्णय घेण्याचे आश्वासन मा.मुख्यमंत्री यांनी दिले.
यावेळी, आमदार सतेज (बंटी) डी. पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर ,आमदार विश्वजित कदम, आमदार राजू आवळे, आमदार सुरेशदादा खाडे, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार शेखर निकम, आमदार वैभव नाईक, आमदार महेश शिंदे, आमदार विक्रम सावंत, आमदार बाळासाहेब पाटील , आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते.
- *आमदार ऋतुराज पाटील*
留言